पुणे : अयोध्येत राम मंदिर बांधल्यानं गरिबांच्या ताटात अन्न येणार आहे का? असा सवाल आज एका विद्यार्थ्यानं थेट सरसंघचालक मोहन भागवतांना विचारला.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या भारतीय छात्र संसद पुण्यात सुरू आहे. त्यात आज सरसंघचालक मोहन भागवत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. समाजाला आदर्श व्यक्तींच्या प्रतिकांची गरज असते, असं उत्तर यावेळी सरसंघचालकांनी दिलंय.
या विद्यार्थ्याला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, आतापर्यंत राम मंदिर झाले नाही म्हणून गरिबांना जेवण मिळाले का? हा प्रश्न केवळ मंदिर बांधण्याचा नाही. आपल्या संस्कृतीचे काही आदर्श पुरुष आहेत. त्यांचे स्मारक उभे राहिले तर त्यातून प्रेरणाच मिळते. समाजासमोर अशा आदर्शांची उदाहरणे असणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
पाहा व्हिडिओ :