शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र बस थांबलीच नाही...

महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या. अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी राजापूर-मुंबई बसचा सांगाडा शोधण्यात नौदलाच्या पथकांला यश आले. सावित्री नदीला आलेल्या पुरात ही एसटी वाहून गेली होती. 

Updated: Aug 13, 2016, 01:00 PM IST
शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र बस थांबलीच नाही... title=

महाड: महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या. अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी राजापूर-मुंबई बसचा सांगाडा शोधण्यात नौदलाच्या पथकांला यश आले. सावित्री नदीला आलेल्या पुरात ही एसटी वाहून गेली होती. 

अखेर या बसचा सांगाडा शोधण्यात पथकाला यश मिळाले. बस बाहेर काढल्यानंतर तिची तपासणी केली असताना बस चालकाने अपघात टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याचे समोर आलेय. 

बसचालकाने हँडब्रेकही खेचला होता. मात्र इतक्या अथक प्रयत्नानंतरही बसचा अपघात टाळता आला नाही. 

जयगड-मुंबई एसटी पुरात खाली जाताना पाहिल्याने राजापूर-मुंबई एसटी बसच्या चालकाने हँडब्रेक लावत बस थांबवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न त्यांनी केले मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले.