लाँग विकएण्ड मुळे एक्स्प्रेस हायवे वर वाहतूक कोंडी

लॉंग विकेण्डमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे.

Updated: Aug 13, 2016, 12:38 PM IST
लाँग विकएण्ड मुळे एक्स्प्रेस हायवे वर वाहतूक कोंडी  title=

लोणावळा : लॉंग विकेण्डमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पुण्याकडे जाणा-या दिशेने ही वाहतुक कोंडी झाली आहे. 

तर पुढे पुणे-सातारा रोडवरही खेड शिवापूर टोलनाका ते नसरापूर फाट्या दरम्यान वाहतूक कोंडी झालीय. शनिवार, रविवार आणि पंधरा ऑगस्टचा सोमवार यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.