गटबाजी उफाळली, राज नाशिकला रवाना

शहरात नाराजी नाट्य सुरू झालं आहे, हे नाराजी नाट्य एवढं टोकाला गेलं आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. 

Updated: Jul 6, 2014, 02:25 PM IST
गटबाजी उफाळली, राज नाशिकला रवाना title=

नाशिक : शहरात नाराजी नाट्य सुरू झालं आहे, हे नाराजी नाट्य एवढं टोकाला गेलं आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत. 

राहल ढिकले यांच्यानिवडीमुळे मनसे आमदार वसंत गिते हे नाराज झाले आहेत. सरचिटणीस अतुल चांडकही नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडीवरून नाशिक मनसेत गटबाजी उफाळली.

वसंत गिते यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. वसंत गिते हे शिवसेनेची वाट धरू शकतात अशीही चर्चा असली, तरी ही बाब चर्चेपुरताच मर्यादीत असेल असंही सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.