'उद्धवशी भेट राजकीय नव्हती' : राज ठाकरे

विधानसभेच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पुण्यात राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं, उद्धव आणि आपली स्मृतीस्थळी झालेली भेट ही राजकीय नव्हती, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं

Updated: Nov 18, 2014, 08:17 PM IST
'उद्धवशी भेट राजकीय नव्हती' : राज ठाकरे title=

पुणे : विधानसभेच्या पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पुण्यात राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं, उद्धव आणि आपली स्मृतीस्थळी झालेली भेट ही राजकीय नव्हती, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं

राजकीय अर्थ नको
एवढंच नाही तर आपली मुलगी उर्वशी हिचा अपघात झाला, त्यावेळी दोन वेळेस उद्धव हॉस्पिटलात आला, त्यामागेही लोकांनी राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न केला होता, पण तो प्रसंग राजकीय अर्थ काढण्याचा नव्हता असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एकीच्या गोष्टीही पटकन घडत नसतात, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय, शिवसेनेने सत्तेत जायचं किंवा नाही तो निर्णय शिवसेनेचा आहे, तो शिवसेना घेईन, विधानसभेच्या पराभवाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर हार-जीत यातून कोणताही राजकीय पक्ष सुटलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

पक्ष बांधणीकडे लक्ष देणार
पराभवाचा फरक पडतो, गैरसमज झाले असतील, तर ते दूर करून, सुधारणा करणं महत्वाचं आहे असंही राज यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात सत्ताधारी आण विरोधकांतला फरकच कळत नाहीय
महाराष्ट्रातली परिस्थीत पाहिली तर काहीही कळतच नाहीय, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? असं झालंय,महाराष्ट्राच्या इतिहासात अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

आवाजी मतदानाला महत्व नाही
आवाजी मतदानाला महत्व नाही, मतदानानेच बहुमत सिद्ध व्हायला हवं होतं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं
राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात या शरद पवारांच्या आजच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी जरी बोलणं टाळलं असलं, तरी राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती ही विचित्र असल्याचं म्हटलं आहे, सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे चित्रच स्पष्ट नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.