ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस सरकारवर टीका केली.
महिलांना रेल्वे प्रवास सुरक्षित नाही
यावेळी राज ठाकरे म्हणाले, "हे सरकार आलं गेलं बातम्या त्याच, काही बदल नाही, महिलांना रेल्वे प्रवास सुरक्षित वाटत नाही, आधीही तेच होतं आताही तेच, मुख्यमंत्री ज्या घरात राहिले, त्या घरात महिलेने आत्महत्या केली, काय बोलले असतील काय माहीत, बहुदा हेच बोलले असतील आपल्या सरकारकडून काहीही होणार नाही".
फक्त थोबाडं बदलली
सिंचन, दुष्काळ प्रश्न, टोल हा प्रश्न तेव्हाही होता, आता फक्त थोबाडं बदलली. शिक्षणाचा विद्यार्थ्याचा भार कमी करणार असं म्हणणारे शिक्षणमंत्री दफ्तराचं वजन काट्याने तपासतायत.
बदल्यांसाठी १०० कोटींचा व्यवहार
या सरकारच्या काळात भ्रष्टाचार थांबला असं म्हणतात, पण एका खात्याच्या अंतर्गत बदल्यांसाठी शंभर कोटीच्यावर पैसे घेण्यात आले मग कुठं झाला बदलं?.
मुख्यमंत्र्यांचे हातपाय बांधलेत- राज
देवेंद्र फडणवीस हा एक चांगला माणूस, पण त्यांचे हातपाय बांधलेत, कसं काम करणार, एकंदरीत त्यांचं वजन पाहून ते कसं धावणार, एक आकारमान पाहून कसं धावतील, टीव्हीत पाहतांना वाटतं त्यांचा तोल जाईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.