नांदेड : पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.
सोमवारी रात्रीही काही तालुक्यात पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासूनच सर्वच तालुक्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली. देगलूर, मुखेड, लोहा, कंधार, अर्धापूर, हदगावसह नांदेड तालुक्यात आणि शहरात पाऊस बरसला.
या पावसामुळे पिकांच्या वाढीसाठी मोठी मदत होणारेय. पाऊस बरसल्यानं बळीराजा सुखावला.
वर्धा जिल्ह्यातही वादळी वा-यासह जोरदार पाऊस
तर वर्धा जिल्ह्यातही वादळी वा-यासह जोरदार पाऊस बरसला. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर वरूणराजाचं आगमन झाल्यानं पिकांना नवसंजीवनी मिळालीय.
बळीराजा दिलासा मिळालाय. तसंच जोरदार पावसामुळे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.