राज्यात वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सहा जणांसाठी काळ ठरला. गुरुवारी दुपारी जिल्ह्यातल्या कोरपना, जिवती, गडचांदूर भागात विजांसह मुसळधार पाऊस झाला. यावेळी एका झोपडीवर वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. 

Updated: Jun 12, 2015, 09:47 AM IST
राज्यात वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू title=

चंद्रपूर : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सहा जणांसाठी काळ ठरला. गुरुवारी दुपारी जिल्ह्यातल्या कोरपना, जिवती, गडचांदूर भागात विजांसह मुसळधार पाऊस झाला. यावेळी एका झोपडीवर वीज पडून सहा शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. 

उष्णता आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना गुरुवारी संध्याकाळी मोठा दिलासा मिळाला तो मान्सून-पूर्वच्या सरींमुळे. मात्र अचानक आलेल्या पावसानं घरी परतणाऱ्या नोकरदारवर्गाची धावाधाव झाली. तरीही उकाडा कमी झाल्यानं नागपूरकर सुखावले. नागपुरात १५ जूनला मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. 

साताऱ्यात बरसला

साता-यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारी ढग दाटून आल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक पडलेल्या वळीवाच्या पावसामुळे उकाड्यानं हैराण असलेल्या सातारकरांना दिलासा मिळालाय. 

पुण्यात दमदार पाऊस

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे पेठ परिसरामध्ये ओढे आणि नाले दुथडी भरुन वाहू लागले. परिणामी नाल्यांचं पाणी घरांमध्ये शिरलं होतं. त्यामुळे नागरिकांचा त्रास वाढला. 

दरम्यान गोव्यात  मान्सून सक्रीय झाल्यापासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत पावसान गोव्यातल्या सर्व भागांत मुसळदार हजेरी लावलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.