पावसाची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी

पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Updated: Jul 1, 2014, 11:41 PM IST
पावसाची वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी title=

पुणे : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे. सध्या दडी मारलेला पाऊस ५ जुलैपासून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

मध्य भारतासह राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार पाऊस होऊ शकेल, अशी माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी सोमवारी दिली. 

जून महिना कोरडा गेला असला तरी उर्वरित कालखंडात मान्सून सरासरी भरून काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'मान्सून' या विषयावर मेधा खोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे आणि सरचिटणीस सुनीत भावे या वेळी उपस्थित होते.

देशाच्या काही भागात वेळेमध्ये दाखल झाल्यानंतर नानौक चक्रीवादळ आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावामुळे मान्सूनची आगेकूच थांबली. त्याचप्रमाणे मान्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने दडी मारली होती. 

बंगालच्या उपसागरामध्ये आता एक-दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. अरबी समुद्रात हवेच्या दाबातील पट्टा वाढला तर किनारपट्टीच्या भागात पाऊस होईल, असे खोले यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.