मुंबई : राज्यात पावसाचे दमदार कमबॅक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत काल तुरळक पाऊस पडला. आज दुसऱ्या दिवशीही पाऊस पडत आहे. तर औरंगाबाद, लातूर, पुण्यासह कोकणपट्ट्यात मुसळधार पाऊस पडला. तर, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. त्याचवेळी अहमनदनगरमध्ये आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी कोकणपट्ट्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर, पुण्यातही दमदार पाऊस झाला. औरंगाबादवरही वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली येथे पावसाने दमदार हजेरी लावली. आज शनिवारी मुंबईत ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी ढगांचा गडगडात आणि विजा चकमत होत्या.
जामखेड येथ वीज कोसळली
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात आज दुपारी वीज पडून ३ शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. दुपारी पेरणीसाठी जामखेड तालुक्यातील देवदैठन गावातील मौजाबाई महारनवर, बबन महारनवर या दाम्पात्त्यासह त्यांचा पुतण्या दत्ता महारनवर हे तिघेही पेरणी करण्यासाठी आपल्या शेतात गेले होते.
दुपारी वादळी वाऱ्यासह वीजेचा कडकडात सुरु झाला. यापासून बचावासाठी हे सर्व जवळच असलेल्या मंदिरात आसऱ्यासाठी गेले. मात्र याच ठिकाणी त्यांच्यावर काळाने घाला घातला. वीज पडून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तातडीने जामखेडचे नायब तहसीलदार राजेंद्र दराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. कुटुंबीयांना लवकरच शासकीय मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मराठवाड्यात आतापर्यंत २५ जणांचा बळी
मराठवाड्यात आलेल्या परतीच्या पावसानं दोन दिवसात १७ शेतकऱ्यांचा बळी घेतलाय. कडाणाऱ्या वीजने मराठवाड्यात २५ जणांचा मृत्यू झाला.
परतीचा पाऊस दिलासा देईल असे वाटत असताना या पावसात गुरुवारी ११ तर शुक्रवारी ६ तर शनिवारी ८ जणांचा वीज पडून मृत्यू झाला. यात, नांदेड - ४, लातूर – ३, परभणी –७ , जालना ३, उस्मानाबाद -२ , औरंगाबाद – ३, बीड -३ असे एकूण दोन दिवसात २५ बळी गेलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.