रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने ठोकले सील

क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्वप्न असलेले महाडच्या रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने सील ठोकले आहे. पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने हे सील ठोकले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 8, 2017, 08:13 PM IST
रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने ठोकले सील  title=

महाड : क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित यांचं स्वप्न असलेले महाडच्या रायगड मिलिटरी स्कूलला बँकेने सील ठोकले आहे. पंधरा कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या महाड शाखेने हे सील ठोकले आहे.

बँकेने हे पाऊल उचलले असले तरी संस्थेच्या संचालकांवर अद्याप कोणतेही गुन्हे बँकेने दाखल केलेले नाहीत. जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत प्रभाकर कुंटे यांनी या मिलीटरी स्कूलची धुरा खांद्यावर घेतली. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर मात्र या स्कूलला अवकळा आली आणि कुंटे हयात असतानाच स्कूल तारण ठेवून उचललेले कर्ज न फेडल्यानं स्कूलला सील ठोकण्यात आले आहे.

वर्षाला सातशे ते आठशे मुलांना मिलीटरी प्रशिक्षण देणारे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिलीटरी स्कूल म्हणून ते नावारूपाला आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेदखील काही काळ या संस्थेचे अध्यक्ष होते.