पुणे : 'एमआयएम'चे अध्य़क्ष असादउद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातल्या सभेला परवानगी नाकराण्यात आलीय.
चार फेब्रुवारीला पुण्याच्या गोळीबार मैदानावर ओवेसी हे मुस्लिम आरक्षण परिषद घेणार होते. यावेळी त्यांच्या भाषणाचा कार्यक्रमही होणार होता.
मात्र, या भाषणात ओवेसींनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेच्या पुण्यातल्या स्थानिक नेत्यांनी दिला होता. त्यामुळं या वाद होण्याची शक्यता लक्षात घेऊन वानवडी पोलिसांनी या सभेला आणि परिषदेलाही परवानगी नाकारलीय.
'यामध्ये, कोणतंही राजकीय कारण नाही... स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच स्थानिक प्रशानसनानं हा निर्णय घेतलाय... ही निर्णय राज्य सरकारचा नाही' असं स्पष्टीकरण यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.