गुन्हा अंगावर घेण्यासाठी पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांची सर्वसामान्य प्रतिमा आजही लोकांच्या मनात खाकी गणवेशातले गुंड अशीच आहे. याला कारण ठरलंय ती पोलिसांची मानसिकता आणि त्यांनी जोपासलेली दंडेलीची वृत्ती... ही अतिशयोक्ती नाही.

Updated: Jan 11, 2015, 10:20 PM IST
गुन्हा अंगावर घेण्यासाठी पोलिसांची तरुणाला बेदम मारहाण title=

पुणे: पोलिसांची सर्वसामान्य प्रतिमा आजही लोकांच्या मनात खाकी गणवेशातले गुंड अशीच आहे. याला कारण ठरलंय ती पोलिसांची मानसिकता आणि त्यांनी जोपासलेली दंडेलीची वृत्ती... ही अतिशयोक्ती नाही.

पुण्यात राहणाऱ्या राकेश यादव या तरुणाला पोलिसांकडून जी वागणूक मिळालीय, ती अंगावर काटा आणणारी आहे. यंत्रांच्या सुटे भागांची दलाली आणि जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार राकेश यादव करतो. राकेशला वाकड पोलिसांनी विना वॉरंट आणि कुठलंही कारण न देता, गुरुवारी ८ जानेवारीला ताब्यात घेतलं. चौकशी करायची असल्याचं सांगत, पोलिसांनी त्याला वाकड पोलीस ठाण्यात आणलं. तिथं पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली.

कशासाठी... तर याचं कारण आहे, पोलिसांना एका गुन्ह्याची उकल झालेली दाखवायची होती. त्यासाठी त्यांना दोन पिस्तुलं आणि कुठल्याही एका अ, ब, क नावाच्या गुन्हेगाराचं नाव हवं होतं. त्यासाठी त्यांनी बिनदिक्कतपणे राकेश यादव याला उचललं आणि त्याला कुठूनही पिस्तुलं आणून देण्यासाठी धमकावलं. नुसतंच धमकावलं नाही, तर त्याला धाक राहावा म्हणून अक्षरशः गुरासारखं बदडलं. गु्न्हा कबुल केला नाही तर गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी सुद्धा, या मुजोर पोलिसांनी राकेश यादवला दिली. या प्रकरणात जबर मारहाण झालेला राकेश यादव सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.