पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
पुण्यातल्या प्रभाग 30 जनता वसाहत दत्तवाडीमधील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रिया गदादे आणि प्रेम गदादे यांनी प्रचारासाठी शांताबाई गाण्याची मदत घेतली आहे. गदादे यांचं हे प्रचारगीत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.