पुणे : मुंबई - पुणे महामार्गावर उर्से टोल नाक्याजवळील ओझर्डे या गावाजवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर माल वहातूक करणाऱ्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. यामुळे या मार्गावरील वहातूक सुमारे तीन तास ठप्प झाली होती.
या ट्रकमध्ये प्लॅस्टीकचे सामान, ए.सी.गॅस सिलेंडर, कपडे, रंगाचे डबे, कागद इत्यादी सामान होते. या सामानामध्ये घर्षण झाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या ट्रक मध्ये असणाऱ्या ए.सी. गॅस सिलिंडरचे वारंवार स्फोट होत असल्याने पोलिसांनी दुसरी कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये या करिता पुण्याकडे जाणारी वहातूक पूर्णपणे थांबवून ठेवल्याने मार्गावर वहानांच्या मोठ मोठ़या रांगा लागल्या होत्या.
आग विझविण्यासाठी तीन अग्नीशामक बंब पाचारन करण्यात आले होते मात्र पाण्याचा फवारा मारल्यावर आग भडकत असल्याने सायंकाळी ५.३० च्या सुमारास लागलेली आगे आटोक्यत आणण्यासाठी रात्रीचे ८ वाजले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.