कात्रजमध्ये चिमुरडी सापडली, आईनंच सोडलं बसस्टॉपवर

पुण्यात कात्रज परिसरातल्या एका बसस्टॉपवर एका साडेतीन वर्षांच्या मुलीला तिची आई तशीच सोडून गेल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या ताब्यात ही मुलगी सध्या आहे. तिच्या आईचा शोध सुरू आहे. 

Updated: Aug 13, 2015, 10:32 PM IST
कात्रजमध्ये चिमुरडी सापडली, आईनंच सोडलं बसस्टॉपवर  title=

अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यात कात्रज परिसरातल्या एका बसस्टॉपवर एका साडेतीन वर्षांच्या मुलीला तिची आई तशीच सोडून गेल्याचं उघड झालंय. पोलिसांच्या ताब्यात ही मुलगी सध्या आहे. तिच्या आईचा शोध सुरू आहे. 

पुण्यात कात्रज परिसरात एक महिला आपल्या मुलीला बसस्टॉवर सोडून गेली. पाणी आणण्यासाठी ही महिला गेली आणि परत आलीच नाही. काही कॉलेजमध्ये शिकणाऱ्या युवकांना ही मुलगी दिसली. त्यांनी या मुलीला पोलिसांच्या हवाली केलंय. या मुलीजवळ एक कपड्यांची बॅग आहे. बॅगेत काही कपडे, एक बाहुली आहे. मुलीच्या कंबरपट्यावर क्रीश चर्च स्कूल असं लिहिलंय. 

ती तिचं नाव सांगू शकत नव्हती. अखेर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वारंवार समजावल्यावर मुलीनं स्वतःचं नाव वंदना दत्ता माने असल्याचं सांगितलंय. तर आईचं नाव स्वाती असल्याचं ती म्हणतेय. 

रात्री उशीरा साडेबारानंतर पोलिसांनी या मुलीला सरकारी रेस्क्यू होममध्ये पाठवलं आहे. मुलीच्या पालकांचा शोध सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.