'ग्राहक पंचायती'च्या बिंदूमाधव जोशींचे निधन

भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, बिंदमाधव जोशी हे ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Updated: May 10, 2015, 08:09 PM IST
'ग्राहक पंचायती'च्या बिंदूमाधव जोशींचे निधन title=

पुणे : भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदूमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, बिंदमाधव जोशी हे ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

मागील वर्षभरापासून ते हृदयाच्या आणि फुफ्फुसांच्या विकाराने आजारी होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. प्रकृती खालावल्यामुळे जोशी यांना मागील आठवड्यात उपचारासाठी रुणालयात दाखल करण्यात आले होते. बिंदूमाधव यांचे दुपारी सव्वा तीनला त्यांची प्राणज्योत मालवली. 

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सायंकाळी ६ ते ८ दरम्यान कसबा पेठेतील 'पसायदान' या बंगल्यात ठेवले जाणार असून त्यानंतर नवी पेठेतील 'वैकुंठ' स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती 'ग्राहक पेठे'चे अध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.