दुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून ९ किलो सोने जप्त

दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

Updated: Oct 26, 2016, 04:13 PM IST
दुबई-पुणे विमानाच्या टॉयलेटमधून ९ किलो सोने जप्त title=

पुणे : दुबईहून पुण्याला आलेल्या स्पाईस जेट विमानाच्या टॉयलेटमध्ये २ कोटी ८० लाख रूपये किंमतीचे ९.१ किलो सोने सापडले आहे. ही घटना पहाटे ४.३०च्या सुमारास घडली. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

स्पाईसजेटच्या दुबई-पुणे विमानात सोने आणल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. विमानाची तपासणी केल्यानंतर टॉयलेटमध्ये एका काळ्या रंगाच्या प्लॉस्टिक बॅगेत सोन्याची बिस्किटे आढळून आली. हे सोने कोणी आणले याचा शोध घेतला जात आहे. विमानतळावरील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.