पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Updated: Nov 12, 2016, 11:49 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यात, कडक पोलीस बंदोबस्त title=

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी येणार आहेत. दरम्यान, लॉज, संवेदनशील ठिकाणी छापे मारण्यात आले आहेत. संशयितांच्या कसून चौकशीवर भर देण्यात आला आहे. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मोदी यांचे कार्यक्रमस्थळी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार आहे. कार्यक्रमस्थळी ते दोन तास थांबणार असून, त्यानंतर हडपसर येथील ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये जाणार आहेत. मोदी यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांच्या बंदोबस्तासाठी पुणे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. 

मोदी यांचे लोहगाव विमानतळावर आगमन होत असल्याने विमानतळानजीकच्या पाच किलोमीटर परिसरात कसून तपासणी करण्यात येत आहे. मोदी रविवारी पुण्यात सुमारे नऊ तास वास्तव्य असणार आहे. अकरा पोलिस उपायुक्त, २० सहायक आयुक्त, ५० पोलिस निरीक्षक आणि दीड हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या शिवाय जलद प्रतिसाद दलाची चार पथकेही तैनात करण्यात येणार आहेत.