कल्याण-डोंबिवलीत राजकीय आखाडा, सेना भाजपचं मिशन 'फोडाफोडी'

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. महापालिकेवर एकहाती वर्चस्व असावे यासाठी दोन्ही पक्षात आतापासून स्पर्धा सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता या दोन्ही पक्षाचं टार्गेट मनसे आहे. 

Updated: Aug 13, 2015, 10:14 AM IST
कल्याण-डोंबिवलीत राजकीय आखाडा, सेना भाजपचं मिशन 'फोडाफोडी' title=

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. महापालिकेवर एकहाती वर्चस्व असावे यासाठी दोन्ही पक्षात आतापासून स्पर्धा सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता या दोन्ही पक्षाचं टार्गेट मनसे आहे. 
 
कल्याण-डोंबिवली बनला राजकीय आखाडा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर मोर्चा मनसेकडे वळविलाय. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीला आता अवघे दोन महिने शिल्लक राहिलेत. सर्व राजकीय पक्षांनी आपापली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र, सत्ताधारी शिवसेना भाजपनं त्यात आघाडी घेतली. 

गेल्या दहा दिवसांत विरोधी पक्षातील १२ नगरसेवक फुटून शिवसेना- भाजपमध्ये गेलेत. त्यात विरोधीपक्ष नेत्यासह काँग्रेसचा आणखी एक नगरसेवक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तीन आणि एक अपक्ष असे एकूण सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागलेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ६ नगरसेवक भाजपच्याही गळाला लागलेत. फोडाफोडीचा शिवसेना-भाजपचा स्कोर समान आहे.

शिवसेनेला 83403 मते पडली (19.1 टक्के). त्यांचे 31 नगरसेवक निवडून आले. भाजपला 46943 मते मिळाली (10.75 टक्के ). त्यांचे 9 नगरसेवक निवडून आले. कॉँग्रेसला 48458 मते मिळाली (11.1 टक्के ). त्यांचे 15 नगरसेवक निवडून आले. राष्ट्रवादी कॉँगेसला 47353 मते मिळाली(10.84 टक्के). त्यांचे 14 नगरसेवक निवडून आले. अपक्ष नगरसेवकांनीही चांगली कामगिरी करताना 68870 मते मिळवली (15.77 टक्के). तब्बल 11 अपक्ष निवडून आले. 

तर, पहिल्यांदाच निवडणूक लढणा-या मनसेनं नेत्रदीपक कामगिरी करताना सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं होतं. मनसेला सत्ता स्थापन करता आली नाही पण सर्वाधिक 125439 मतं मिळाली (28.72 टक्के). त्यांचे 28 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे सहाजीकच एवढी मोठी नगरसेवकांची फौज असणा-या मनसेकडे आता शिवसेना भाजप आपला मोर्चा वळवणार हे निश्चित. तिथेही या दोन पक्षांकडून फोडीफोडी होण्याची चिन्हं आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षानं सपाटून मार खाल्ल्यानं आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मनसे नगरसेवकांचीही धडपड सुरु आहे. गेल्या निवडणुकीत मनसेनं सर्वाधिक नुकसान भाजपचं केलं. आता राज्यात सत्ता हातात असल्यानं, त्या अपयशाची पुरेपूर किम्मत वसूल करण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. 

कल्याणमधील शिवसेनेचं वर्चस्व असलेली 27 गावं वर्ग करण्यात शिवसेनेच्याही अपेक्षा वाढल्याहेत. मनसेचे नगरसेवक शिवसेनेकडे खेचण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरु केलेत. अशा वातावरणात मनसे नेतृत्वानंही आपले नगरसेवक फुटू नयेत याची सर्वोतपरी जबाबदारी स्थानिक पदाधिका-यांवर टाकली आहे. 

मनसेचे काही नगरसेवक शिवसेना-भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्याही बाहेर येऊ लागल्याहेत. फुटीची चिन्हं लक्षात घेत राज ठाकरेंनी नुकत्याच जाहीर केलेल्या पदाधिकारी फेररचनेत कल्याण डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांना सरचिटणीस, उपाध्यक्ष या पदांवर बढती दिलीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर युतीची तयारी दर्शवली असली तरी दोन्ही पक्षांकडून स्वबळाचाही चाचपणी होतेय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.