हिंजवडीतल्या फार्महाऊसवर पोलिसांची धाड; ५० जण ताब्यात

पुण्यात हिंजवडी जवळील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी ५० तरूण-तरूणींना ताब्यात घेतलं.

Updated: Jul 18, 2015, 09:49 PM IST
हिंजवडीतल्या फार्महाऊसवर पोलिसांची धाड; ५० जण ताब्यात title=

पुणे : पुण्यात हिंजवडी जवळील एका फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बेकायदेशीर पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी ५० तरूण-तरूणींना ताब्यात घेतलं.

यापैंकी 11 मुलींना सोडण्यात आलंय. सर्वांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आलीय. 

हिंजवडी जवळच्या नेरे गावातील एका फार्महाऊसवर कोणतीही परवानगी न घेता पार्टी सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. 

त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा या फार्महाऊसवर छापा टाकला. तपासणी अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.