हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. सुधाकर गंथळे असं मृत पोलिसाचं नावं आहे.

Updated: Dec 4, 2014, 12:23 PM IST
हिवाळी अधिवेशनासाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू  title=

नागपूर: विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये बंदोबस्तासाठी आलेल्या एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. सुधाकर गंथळे असं मृत पोलिसाचं नावं आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी हवालदार सुधाकर गंथळे वर्ध्याहून नागपुरात आले होते. मात्र बंदोबस्तादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बंदोबस्तासाठी आलेल्या गंधळेंची राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं ते रात्री पोलिसांच्या टाटा सुमोमध्येच झोपले होते आणि सकाळी मात्र ते मृतवस्थेत आढळले. सुधाकर गंथळे यांच्या मृत्यूचं नेमंक कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गंथळे हे पोलीस गाडीचे चालक म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, सध्या नागपूरासह संपूर्ण विदर्भात थंडीची लाट आहे. त्यातच विधाससभेचं हिवाळी अधिवेशन होत असल्यानं पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या टीम नागपुरात दाखल झाल्या आहेत. अशाच खरंच कशामुळं गंथळेंचा मृत्यू झाला? याचं कारण शोधणं गरजेचं झालंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.