खडसेंवरील आरोपामुळे मोदी संतापले

महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर होत असलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही संतापले आहेत

Updated: Jun 1, 2016, 07:06 PM IST
खडसेंवरील आरोपामुळे मोदी संतापले title=

नवी दिल्ली : महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर होत असलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही संतापले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खडसेंमुळे पक्ष आणि सरकार अडचणीत येत असल्याचं मोदी आणि भाजपच्या बड्या नेत्यांना वाटत आहे, अशी माहिती मिळत आहे. 

केंद्र सरकारच्या दोन वर्षपूर्तीचा कार्यक्रम आठवडाभर चालणार आहे. यानंतर खडसेंकडून महसूलमंत्रीपद काढण्यात येऊ शकतं. खडसेंवरच्या कारवाईची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांवर दिली आहे, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

चार जून ते दहा जूनपर्यंत मोदी परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. याच काळामध्ये एकनाथ खडसेंचं महसूलमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.