बे-वॉच बारमध्ये पोलिसावर हल्ला, गायिकेचा विनयभंग

 उल्हासनगरमधील बे-वॉच ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारमध्ये गाण्यांचा कार्यक्रम सुरूच ठेवावा, अशी सक्ती करीत बारमधील गायिकेचा विनयभंग करून बारची मोडतोड करण्यात आली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही संशयितांनी हल्ला केला. प्रकरणी पाच जणांना अटक केली. 

Updated: Aug 7, 2015, 05:10 PM IST
बे-वॉच बारमध्ये पोलिसावर हल्ला, गायिकेचा विनयभंग title=

उल्हासनगर :  उल्हासनगरमधील बे-वॉच ऑर्केस्ट्रा बारमध्ये बारमध्ये गाण्यांचा कार्यक्रम सुरूच ठेवावा, अशी सक्ती करीत बारमधील गायिकेचा विनयभंग करून बारची मोडतोड करण्यात आली. हल्लेखोरांना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही संशयितांनी हल्ला केला. प्रकरणी पाच जणांना अटक केली. 

कॅम्प नंबर एकमध्ये बे वॉच ऑर्केस्ट्रा बार आहे. मध्यरात्री दीडच्या सुमारास बार बंद करण्याची वेळ झाल्याने गायिकेने गाणे थांबवले. त्या वेळी अमरदीपसिंग लबाना याने "मी दिल्लीहून आलो आहे, तुला गाणे गावेच लागेल‘, असे तिला बजावले; मात्र तिने नकार देताच महेंद्रसिंग लबाना याने गायिकेचे केस ओढले.

तिला वाचवण्यासाठी बारचा व्यवस्थापक आणि वेटर यांनी धाव घेतली. त्यांनाही संशयितांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या तिघांनी बारची तोडफोड केली. गस्तीवर असणारे पोलिस बबन बांडे त्याचवेळी परिसरात गस्त घालत होते.

त्यावेळी त्यांना बारमधील गोंधळ ऐकू आला. काही तरी गडबड असल्याचा संशय त्यांना आल्याने बांडे थेट बारमध्ये घुसले. त्यांनी संशयितांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी बांडे यांच्या डोक्‍यात खुर्ची घातली. यात बांडे यांच्या डोक्‍यावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.