यवतमाळ : महसूलराज्यमंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या दहशतीत जिल्ह्यातलं पोलीस खातं काम करत असल्याची धक्कादायक बाब उघड झालीय.
याच संदर्भातली पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह आणि पोलीस निरीक्षक भारत कांबळे यांच्यातल्या संभाषणाची एक क्लीप प्रसिद्ध झालीय. यात हा प्रकार उघड झालाय.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या दबावामुळं पोलीस अधीक्षक अखिलेश सिंह यांनी पोलीस निरीक्षक भारत कांबळे यांची बदली केली खरी मात्र त्यांना जिल्ह्याबाहेर घालवण्यासाठी पालकमंत्र्यांचा दबाव येत असल्याचं अधीक्षक अखिलेश सिंह यांनी ऑडिओ क्लीपमध्ये म्हटलंय.
पाच लाख रुपयाची खंडणी दिली नाही म्हणून घाटंजी शिवसेना तालुका प्रमुखांसह सात जणांनी वन परिक्षेत्र अधिकारी बाबाराव घटाळे यांना बेदम मारहाण केली होती. या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, वन परिक्षेत्र अधिकाऱ्यानं दिलेली तक्रार खोटी असल्याचा दावा करत पीआय कांबळे यांनी मारहाण केल्याची उलट तक्रार शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधीक्षकांकडे केली.
त्यानंतर कांबळेंची दुसऱ्या ठिकाणी बदली करण्यात आली. मात्र त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करण्यासाठी दबाव येत आहे.
ऐकूयात हे धक्कादायक संभाषण...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.