शिर्डी : नाताळाच्या सुट्यांमध्ये शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. या भक्तांनी साईमंदीराच्या दानपेटीत भरभरुन दान केलय. दि २५ ते २७ डिसेंबर या काळातील दानपेट्यांतली मोजदाद केली असता दानपेटीत ३ कोटी ५३ लाख रोखांची रक्कम जमा झालीय. याशिवाय ३४८१ ग्राम सोने तर १० किलो चांदी प्राप्त झाली आहे.
आजमितीला साई संस्थानकडे १४०० कोटीच्या ठेवी ३५० किलो सोने आणि ४ हजार किलो चांदी जमा आहेत. दरम्यान नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी भक्तांनी शिर्डीत गर्दी केलीये.
आज २०१५ या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने साईभक्तराच्या दर्शनासाठी रात्रभर साईमंदीर उघडे ठेवण्यात येणार आहे शिर्डीत साईभक्तांची गर्दी लक्षात घेवुन शिर्डीतील अनेक हॉटेल्स मध्येही नव वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
साई संस्थाननेही विवीध भजनांच्या कार्यक्रमाच आयोजन केलं आहे. साईंच्या मुर्तीला आज सुवर्ण अलंकार घालन्यात आलेत तर साईंच्या मंदीराला विद्युत रोषनाई आणी फुलांची आकर्षक सजावटही करन्यात आली आहे.