जळगाव : जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या पोलिसांचं एक माणूसकीशून्य रूप पाहायला मिळालं.
खडकदेवळा या गावातल्या एका विवाहितेचे एका तरूणाशी अनैतिक संबंध होते. या दोघांना त्या महिलेच्या नातेवाईकांनी विवस्त्र करून बेदम मारहाण केली.
विवस्त्र अवस्थेतच या दोघांचे फोटोही काढले गेले. एवढंच नव्हे तर कारवाई करण्यास आलेल्या पोलिसांनीही विवस्त्र अवस्थेत असलेल्या पीडित तरुण-तरुणीला शिवीगाळ केल्याचं आरोप होतोय.
गावक-यांनी मारहाण केल्यानं मरणासन्न अवस्थेत असलेल्या या दोघा जखमींना साधं मदत करण्याचं सौजन्यही पोलिसांनी दाखवलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.