मनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले

अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

Updated: Apr 9, 2015, 01:22 PM IST
मनमाड येथे धावत्या रेल्वेत मारहाण करत प्रवाशांना लुटले  title=

नाशिक : अनकाई रेल्वेस्थानकांच्या दरम्यान धावत्या मनमाड - नगरसूल पॅसेंजर ट्रेनमध्ये सहा जणांना मारहाण करत लुटले. त्यामुळे रेल्वेतील सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. 

लुटारुंनी लोखंडी रॉड, पट्ट्या, चाकूच्या सहाय्याने हल्ला करून सहा जणांना लुटल्याची थरारक घटना बुधवारी रात्री २.३० वाजणाच्या दरम्यान घडली. यामुळे रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

मनमाड-नगरसुल पॅसेंजर नावाने धावणाऱ्या या ट्रेनमध्ये संशयीत लुटेऱ्यांपैकी एक मनमाड येथून तर दोन अनकाई येथून चढले. ३ जणांच्या या टोळीने अनकाई स्थानकापुढे ट्रेन येताच प्रवाशांना चाकू, लोखंडी रॉड आणि पट्ट्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. 

प्रवाशांचे महागडे मोबाईल आणि सुमारे दीड लाख रूपये या लुटारुंनी लुटले. रेल्वे पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.