पानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी

ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Updated: Sep 26, 2015, 04:08 PM IST
 पानसरे हत्या : समीर गायकवाडच्या कोठडीत वाढ तर श्रद्धा पवारची चौकशी title=

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्या पोलीस कोठडीत आज दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर श्रद्धा पवार हिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समीर गायकवाड याला आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या पोलीस कोठडीत २८ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. तर, रुद्र आणि समीरचा काहीही संबंध नसल्याचे, समीरच्या वकिलांनी सांगितले.  

पानसरे हत्या प्रकरणी सनातनची साधक श्रद्धा पवार हिलाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, समीर तपसात मदत करत नसल्यामुळे त्याची ब्रेन मॅपिंग करण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे प्रयोगशाळेत पाठविलेले आवाजाचे नमुने समीरच्या आवाजाशी जुळले असून गुजरातमधील रिपोर्ट अजून आलेला नाही, समीरची मैत्रीण ज्योती कांबळे हिने आपल्यासमोर समीरने पानसरे यांची हत्या केल्याचे बोलले आहे, असे तपासात पुढे आलेय. आता श्रद्धा हिच्या चौकशीत काय पुढे येते याची उत्सुकता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.