संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका... सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे.
गेल्या निवडणुकीत याठिकाणी भारत भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं सत्ता संपादन केली होती. अडीच वर्ष नगराध्यक्षपदही राखलं. नंतर भालके गटातील 3 नगरसेवक फुटले तसंच एका नगरसेवकाचं पद रद्द झाल्यानं परिचारक यांच्या शहरविकास आघाडीच्या ताब्यात सत्ता आली. त्याच वेळी चार जागेच्या पोटनिवडणुकीत शहर विकास आघाडीनं जिंकल्या आणि नगरपालिकेवर निर्विवाद सत्ता स्थापन केली.
राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र परिचारकांना अनेकांचं आव्हान आहे...
पंढरपूरचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष असं असल्यानं अनेकांनी देव पाण्यात ठेवते. इच्छुकांची गर्दी असल्यानं अनेकांच्या महत्त्वाकांक्षेनं पक्षांसमोर अडचण निर्माण झालीय.
तरीही परिचारक गटाकडून आमदारांचे बंधू उमेश परिचारक, नागेश भोसलेंचं नाव आघाडीवर आहे तर आमदार भारत भालके गटाकडून किरण घाडगे, रघुनाथ साबळे यांचं नाव आघाडीवर आहे तर सेनेचे प्राध्यापक रोंगे ही मैदानात उडी मारण्याच्या तयारीत आहेत. या तिरंगी लढतीनं पंढरपूरची नगराध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच रंगणार असं दिसतंय.