हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन

राज्यातील मंत्र्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं तसंच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील हेविवेट मंत्र्याचं वजन कमी करण्याचा चंग राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बांधलाय.

Updated: Dec 7, 2016, 02:04 PM IST
हिवाळी अधिवेशनादरम्यान आरोग्य शिबिराचे आयोजन  title=

नागपूर : राज्यातील मंत्र्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं तसंच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील हेविवेट मंत्र्याचं वजन कमी करण्याचा चंग राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी बांधलाय.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मुख्यमंत्र्याचं राजकीय वजन जरी वाढलं असलं तरी त्यांचं शारीरिक वजन मात्र कमालीचं घटलंय. यामुळे  28 किलो वजन कमी करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या अभियानाचे खरे ब्रँड अॅम्बेसेडर असल्याचं यावेळी महाजन यांनी सांगितलं. लठ्ठपणा मोठा आजार असून देशातील मोठा वर्ग याने ग्रस्त आहे. त्यामुळे आमदारांचं वजन नियंत्रणात राहण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचं कौतूक केलं.