मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 7, 2016, 08:09 AM IST
मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर  title=

टिटवाळा : आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

टिटवाळा आणि खडावली दरम्यान मुंबईकडून येणारी आणि जाणारी वाहतूक थांबललीय. मात्र, प्रवाशांच्या आंदोलनामुळेच वाहतूक खोळंबल्याचा कांगावा रेल्वे प्रशासन करतंय. यावरूनच मध्य रेल्वेच्या उलट्या बोंबा पहायला मिळत आहेत.

दुसरीकडे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. वाहतूक थांबवण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

पहाटे मुंबईकडे येणारे लोक टिटवाळ्याच्या नदीवर असणाऱ्या पुलावरून चालत स्टेशनवर येत आहेत.