शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे.  

Updated: Nov 3, 2016, 04:58 PM IST
शरद पवारांचा वारसदार काळ ठरवेल- सुप्रिया सुळे  title=

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा वारसदार कोण याचं थेट उत्तर देणं त्यांची कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे.  यशवंतराव चव्हाणांचे विचार शरद पवारांनी पुढे नेले, त्यामुळे त्यांना यशवंतरावांचे मानसपुत्र मानलं जाऊ लागलं. त्या पवारांचा वारसदार कोण असेल, हे येणारा काळच ठरवेल, असं सुळे म्हणाल्यात.

पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अजित पवार आणि सुळे यांच्यामध्ये सत्तासंघर्ष सुरू असल्याची कुजबुज राज्यात सुरू असताना सुळे यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जातं आहे.