नाशिक : कांदा सर्वसामान्यांना रडवणार आहे. लासलगाव होलसेल बाजारपेठेत कांद्याची आवक कमालीची घटलीय. त्यामुळे कांद्याच्या किंमती प्रचंड वाढायला लागल्या आहेत.
लासलगावात कांदा ४३ रूपये प्रती किलो किंमतीवर पोहोचलाय. सध्याची कांद्याची सरासरी किंमत ३७ रूपयांपेक्षा ही होलसेल किंमत जास्त आहे. त्यामुळे काही दिवसातच कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची चिन्हं आहेत.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात १० हजार क्विंटल कांद्याची आवक झाली मात्र यावर्षी ऑगस्ट महिन्यात फक्त साडेतीन हजार क्विंटल कांद्याची आवक झालीय. यावर्षी सुरूवातीला झालेला अवकाळी पावसामुळे कांद्याचं उत्पादन कमालीचं घटलंय.
तसंच जुलैपासून पावसाने ओढ दिल्यामुळेही नवं पिक अजून आलेलं नाही. त्याचा मोठा फटका म्हणजे कांद्याची आवक घटलीय. आत्तापर्यंत गोदामात साठवलेला ३० लाख टन कांदा सप्टेंबरपर्यंतचीच निकड पूर्ण करू शकणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.