धबधब्यावर 60 फुटांवरून घसरून तरुणाचा मृत्यू

धबधब्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आंबोलीत एका धोकादायक धबधब्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Updated: Jul 23, 2016, 06:52 PM IST
धबधब्यावर 60 फुटांवरून घसरून तरुणाचा मृत्यू  title=

सिंधुदुर्ग : धबधब्यांसाठी प्रसिध्द असलेल्या आंबोलीत एका धोकादायक धबधब्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव मधील ११ जणांचा एक ग्रुप पिकनिकसाठी आंबोलीला आला होता. 

मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर एक धोकादायक धबधबा आहे. तिथे हा ग्रुप मौजमज्जा करत असताना या ग्रुपमधील रुद्राप्पा विठ्ठल बजेरो हा १९ वर्षाचा युवक धबधब्यावरून घसरून ६० फूट दरीत कोसळला. मित्रांनी केलेल्या आरडाओरडा मुळे स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत त्याला दरीतून बाहेर काढलं, पण त्याचा मृत्यू झाला होता.