कल्याणमधून ISISशी संबंधीत संशयीताला अटक

शहरातून ISISशी संबंधीत संशयीताला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसनं केलेल्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली. रिझवान खान असे याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत ट्रान्झीस्ट रिमांड देण्यात आली आहे.

Updated: Jul 23, 2016, 02:36 PM IST
कल्याणमधून ISISशी संबंधीत संशयीताला अटक title=

कल्याण : शहरातून ISISशी संबंधीत संशयीताला अटक करण्यात आली आहे. केरळ पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसनं केलेल्या संयुक्त कारवाईत ही अटक करण्यात आली. रिझवान खान असे याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता २५ जुलैपर्यंत ट्रान्झीस्ट रिमांड देण्यात आली आहे.

दरम्यान,  या आधी आर्शिद  कुरेशी या संशयिताला नवी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. मरिअम नावाच्या महिलेला इसिसमध्ये भरती केल्याचा आरोप त्याच्यावर होता. आर्शिद हा झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च सेंटरमध्ये काम करायचा.

रिझवान आणि आर्शिद  हे दोघे मुलींना प्रेम जाळ्यात ओढत असल्याची माहिती पुढे आलेय. एका जोडप्याचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये भरती करण्यासाठी मदत केल्याचा आरोप रिझवानवर आहे. दोन दिवसांपूर्वी  केरळ पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत आरशीदला अटक केली होती.

आता कल्याणमधून रिझवान खान  या तरुणाला अटक केली. त्याला किल्ला कोर्टाने २५ जुलैपर्यंत ट्रान्झीटर रिमांड दिलाय.  तरुणांना धर्मपरीवर्तन करण्यास भाग पाडणे त्यांना दहशतवादाच्या मार्गावर पाठवणे आणि आयसीस या दहशतवादी संघटनेला मदत करणे असे आरोप रिझवानवर ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र एटीएसने कल्याणमध्ये रिझवानचे कार्यालय आणि घरी देखील छापे टाकलेत. गेल्या वर्षी कल्याण येथून जे चार तरुण सीरिया येथे दहशतवादी कृत्य करण्यास गेले होते. त्यावेळी देखील तपास यंत्रणांनी रिझवानची चौकशी केली होती. संशयीत आरोपी आर्शिद कुरेशी आणि रिझवान हे झाकीर नाईकचे खास मानले जातात.

 कुरेशीनं रिझवानच्या मदतीनं केरळमधून २१ मुलांना आयसिसच्या मार्गावर जाण्यास प्रवृत्ते केले होते. यात तीन मुलींचाही समावेश होता. यापैकी 4-5 मुलं आणि 2 ख्रिश्चन मुलींचे धर्मपरिवर्तन करण्यात आले होते.  तरुण तरुणींना आपल्या जाळात ओढण्यासाठी कुरेशीआणि रिझवानची मोडस ऑपरेंडी होती.