बकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल

ओमप्रकाश बकोरियांची पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली केल्याबाबत 'झी २४ तास'नं दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर रा्ज्य सरकारला अखेर जाग आलीय. 

Updated: Jan 15, 2015, 10:06 AM IST
बकोरियांची बदली रद्द... 'झी २४ तास'च्या बातमीची दखल title=

पुणे :  कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ओमप्रकाश बकोरियांची पुणे मनपा अतिरिक्त आयुक्तपदावरून बदली केल्याबाबत 'झी २४ तास'नं दिवसभर पाठपुरावा केल्यानंतर रा्ज्य सरकारला अखेर जाग आलीय. बकोरियांकडे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार पुन्हा सोपवण्यात आलाय.

'बकोरियांच्या बदलीबाबत आपल्याला लक्षात आणून देण्यात आलंय.... याबाबत योग्य तो निर्णय घेणार' असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलं होतं. त्यानुसार बकोरिया यांच्याकडे पुन्हा अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला.  

मात्र सरकार बकोरियांची बदली रद्द करून त्यांना महापालिकेत कायम ठेवणार का? असा सवालही उपस्थित होतोय. बकोरिया हे प्रामाणिक आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक. अशाच बकोरियांना राजकारणाचा बळी पडावे लागेल. गेल्या अकरा महिन्यांच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा बदली झाली आहे.

ओमप्रकाश बकोरिया यांच्या बदली प्रकरणाचा 'झी २४ तास'नं कसा सातत्यानं पाठपुरावा केला, त्यावर नजर टाकूयात... 
* १३ जानेवारी २०१५ - पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची अवघ्या ११ महिन्यांत बदली
* १४ जानेवारी २०१५ - बकोरियांची बदली रद्द करा, पुणेकर नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... दुपारी  १.०० वाजता - 'झी २४ तास'ने दाखवली बातमी,
* भाजप आमदाराच्या हट्टामुळे बदली झाल्याचा गौप्यस्फोट
* राजकीय पक्षांची आंदोलने
* आमदार माधुरी मिसाळ यांचे विरोधकांना आव्हान
* सायंकाळी ६ वाजता - मुख्यमंत्री फडणवीसांकडून बातमीची दखल, थोड्याच वेळात बकोरियांकडे पुन्हा अति. आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आल्याचं स्पष्ट 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.