ओबामा - गडकरी यांच्यात होणार 'सी-प्लेन'वर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याची आणि स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. ओबामा कोणाला भेटणार, कुठे उतरणार, कोणाच्या भेटी घेणार याचीच जास्त चर्चा आहे. मात्र, वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि बराक ओबामा यांच्यात चर्चा होणार आहे. ही चर्चा 'सी-प्लेन'वर असणार आहे.

Updated: Jan 23, 2015, 11:35 AM IST
ओबामा - गडकरी यांच्यात होणार 'सी-प्लेन'वर चर्चा title=
छाया - डीएनए

नागपूर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या दौऱ्याची आणि स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. ओबामा कोणाला भेटणार, कुठे उतरणार, कोणाच्या भेटी घेणार याचीच जास्त चर्चा आहे. मात्र, वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि बराक ओबामा यांच्यात चर्चा होणार आहे. ही चर्चा 'सी-प्लेन'वर असणार आहे.

बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान नितीन गडकरी त्यांच्याशी 'सी-प्लेन' तंत्रज्ञानाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशात पर्यटन वाढीसाठी काय करता येईल, यावर गडकरी भर देत आहेत. तसेच वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जातआहे. 

ओबामा यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना 'सी-प्लेन'चे तंत्रज्ञान भारताला देण्याची विनंती करणार आहेत. या क्षेत्रात अमेरिका आणि कॅनडा हे दोन देश अतिशय प्रगत मानले जातात. हे तंत्रज्ञान भारताला मिळाले तर देशात सी-प्लेनची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू होईल. गडकरी यांच्या पुढाकारामुळेच यापूर्वी सी-प्लेनची चाचणी नागपूर जिल्ह्यात खिंडसी आणि मुंबई येथे घेण्यात आली आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.