तरूण-तरूणीच्या मारहाणीविरोधात 'राईट टू लव्ह' रॅली

पुण्यातील महाविद्यालयातील युवकांनी 'राईट टू लव्ह' रॅली काढली, आणि लातुरातील तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीच्या निषेध व्यक्त केला.  

Updated: Jan 22, 2015, 07:24 PM IST
तरूण-तरूणीच्या मारहाणीविरोधात 'राईट टू लव्ह' रॅली title=

पुणे : पुण्यातील महाविद्यालयातील युवकांनी 'राईट टू लव्ह' रॅली काढली, आणि लातुरातील तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीच्या निषेध व्यक्त केला.  

गनिमी कावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी लातूरमध्ये एका तरूण आणि तरूणीला बेदम मारहाण केली होती. याविरोधात गनिमी कावा संघटनेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन जोरदार घोषणाबाजी केलीय.

लातुरात 30 नोव्हेंबर 2014 रोजी ही घटना घडली होती. मारहाणीनंतर समाजकंटकांनी मुलीचा व्हिडीओही व्हॉटसअॅपवर व्हायरल केला. यानंतर अखेर सहाही गुन्हेगारांना अटक करण्यात आली. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत गनिमी कावाचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसेसह 6 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.