लवकरच जिल्ह्यावरच जातपडताळणी कार्यालय

जातपडताळणी आता जिल्ह्यावरच होणार आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा एकनाथ खडसे यांनी जळगावात केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होण्याची शक्यता आहे. जळगावातील जी. एस. ग्राउंडवर आयोजित आदिवासी टोकरे कोळी महासंघाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.

Updated: Mar 29, 2015, 09:26 PM IST
लवकरच जिल्ह्यावरच जातपडताळणी कार्यालय title=

जळगाव : जातपडताळणी आता जिल्ह्यावरच होणार आहे, अशी महत्वपूर्ण घोषणा एकनाथ खडसे यांनी जळगावात केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून होण्याची शक्यता आहे. जळगावातील जी. एस. ग्राउंडवर आयोजित आदिवासी टोकरे कोळी महासंघाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.

या नवीन घोषणेमुळे जातपडताळणीसाठी आता विभागीय कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही. तर जातपडताळणीचं ऑफिस आता जिल्ह्यावरच सुरू करण्यात येणार आहे.

आरक्षण लागू असलेल्या प्रत्येक समाजातील व्यक्तीला शिक्षण आणि नोकरीसाठी त्या-त्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणे आवश्यक असतं. परंतु ही सुविधा सध्या प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता हा त्रास कमी होणार आहे.

टप्प्याटप्प्यानं राज्यातील सर्वच जिल्ह्यांत जातपडताळणीसाठी कार्यालयं आगामी काही दिवसांत सुरू होतील, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.