मंत्रीमहोदय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिस्तूल नकोय

 जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला पिस्तूल खोचून भाषण ठोकलं आहे. हे भाषण मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर होतं, जळगावात मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला तेव्हा, हे कंबरेला खोचलेलं पिस्तूल दिसून आलं.

Updated: Mar 29, 2015, 08:37 PM IST
मंत्रीमहोदय त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिस्तूल नकोय title=

जळगाव :  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला पिस्तूल खोचून भाषण ठोकलं आहे. हे भाषण मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर होतं, जळगावात मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला तेव्हा, हे कंबरेला खोचलेलं पिस्तूल दिसून आलं.
  
मंत्री महोदयांना असते तशी सुरक्षा गिरीश महाजन यांनाही आहे, मात्र तरीही गिरीश महाजन पिस्तूल बाळगतात, सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिस बंदोबस्त असताना महाजन यांना असुरक्षित का वाटतं?.

गिरीश महाजन यांच्याकडे परवाना असलेलं पिस्तुल आहे. मात्र जाहीर कार्यक्रमात मुकबधीर विद्यार्थ्यांसमोर असं पिस्तूल बाळगण्याची गजर काय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.