४२ गावांचा वीजपुरवठा ९ दिवसांपासून खंडित

जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीजपुरवठा गेल्या नऊ दिवसांपासून खंडित आहे. ट्रांसफॉर्मर जळाल्यानं 42 गांवाचा विज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मागील 9 दिवसांपासून ही गावं अंधरात आहेत. विज नसल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले.

Updated: Nov 15, 2016, 06:42 PM IST
४२ गावांचा वीजपुरवठा ९ दिवसांपासून खंडित title=

नांदेड : जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीजपुरवठा गेल्या नऊ दिवसांपासून खंडित आहे. ट्रांसफॉर्मर जळाल्यानं 42 गांवाचा विज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मागील 9 दिवसांपासून ही गावं अंधरात आहेत. विज नसल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले.

किनवट-निर्मल या महामार्गावर गावक-यांनी दोन तास रास्ता रोको केला. यावर्षी पाऊस चांगला झाल्यानं शेतक-यांनी रब्बीची पेरणी केली. अजूनही गहु, हरभरा आणि ज्वारीची पेरणी सुरु आहे. मात्र, विज नसल्यानं पेरणी थांबलीय. शिवाय वीजेअभावी आलेल्या पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिक वाळुन जायची भीती आहे. दरम्यान, तर लवकर वीज पुरवठा सुरु करण्याचं आश्वासन एमएसईबीकडून देण्यात आलं आहे.