सातारा : साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. संतोष पोळ यानं आणखी पाच खून केल्याची कबुली दिली आहे.
यातले तीन मृतदेह संतोष पोळच्याच फार्महाऊसमधून पोलिसांनी उकरून काढले आहेत. यावरून संतोष पोळ डॉक्टर नसून सीरियल किलर असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळं सातारा जिल्हा हादरला आहे.
आर्थिक देवाणघेवणच्या वादातून हे खून झाले असल्याचे पोलिसांचा प्राथमिक तपासातील अंदाज आहे. अद्यापपर्यंत पोलिसांनी फार्महाऊसवरून जमिनीत पुरलेले तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या खूनांमध्ये एका सोनाराचाही समावेश. 5 मृतदेहांमध्ये दोन पुरूष तीन महिलांचा समावेश आहे.