राज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला

शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे, असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला. 

Updated: Nov 22, 2016, 10:53 PM IST
राज्यमंत्री गुलाबराव यांचा भाजपला असाही टोला title=

जळगाव : शिवसेनेमुळेच राज्यात भाजप सत्तेत आहे, असा टोला लगावत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपकडून घेतल्या जाणाऱ्या कामांच्या श्रेयावर निशाणा साधला. 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगरपालिकेच्या निवडणुक प्रचार सभेत गुलाबराव पाटलांनी भाजपला टीकेचे लक्ष्य करून जोरदार फटकेबाजी केली. 

लोकसभा निवडणुकीत मोदींना आम्ही छातीवर घेऊन फिरलो, त्यामुळे पाचशे हजारांच्या नोटा बंदीच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध नाही, मात्र ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. 

शिवसेनेचा त्याला  विरोध आहे. नोट बंदीचा फटका खुद्द आपल्या कुटुंबियालाही बसल्याची कबुली यावेळी गुलाबरावांनी दिली.