राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी

मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

Updated: Jul 5, 2015, 11:01 PM IST
राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयीन कोठडी title=

सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. आमदार कदम यांच्यासह ५७ आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
 
आठ दिवसांपूर्वी आमदार रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ पोलिस स्टेशनवर दगडफेक केली होती. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यावरोधात गुन्हा दाखल झाला होता, त्यानंतर आज रमेश कदम आणि 57 आंदोलकांना मोहोळ कोर्टात हजर करण्यात आले होते. 

पोलीस अटक करतील म्हणून रमेश कदम शरण आले. मात्र, त्याआधी त्यांनी त्यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरातही दिली होती. त्यानुसार रमेश कदम पोलिसांमोर आत्मसमर्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस आणि कदमांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि शेवटी आक्रमक झालेल्या कदम समर्थकांनी पोलिस स्टेशनवर दगडफेक केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.