धुळे : धुळे महापालिकेचे आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महासभा सुरु असताना वार्ड क्रमांक २१ च्या नगरसेविका मायादेवी परदेशी या स्थानिक नागरिकांसह बैठकीत आल्या. दूषित पाण्याच्या प्रश्नावरून त्यांची आणि नागरिकांची शाब्दीक चकमक झाली. आयुक्त तिथून आपल्या केबिनमध्ये जायला निघाले, तेव्हा आपला गळा दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी फिर्याद आयुक्त भोसलेंनी पोलिसात दिली.
या प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका मायादेवी परदेशी, त्यांचे पती महादेव परदेशी, स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, नगरसेवक नंदू सोनार, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक मनोज मोरे यांच्यासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या आयुक्त भोसलेंना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.