डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...

ऑक्टोबर २००५ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या ईगतपुरी तालुक्यातल्या वैतागवाडी गावाला डॉ. कलाम यांनी भेट दिली होती. त्यांच्या येण्यानं गावात आशेचा किरण निर्माण झाला. विकासाची गंगा वाहू लागली. त्यामुळं गावाचं नाव वैतागवाडी बदलून आशाकिरण वाडी ठेवण्यात आलं. 

Updated: Jul 28, 2015, 09:28 PM IST
डॉ. कलामांनी बदलली 'वैतागवाडी'ची ओळख...  title=

वैतागवाडी, नाशिक: ऑक्टोबर २००५ मध्ये नाशिक जिल्ह्याच्या ईगतपुरी तालुक्यातल्या वैतागवाडी गावाला डॉ. कलाम यांनी भेट दिली होती. त्यांच्या येण्यानं गावात आशेचा किरण निर्माण झाला. विकासाची गंगा वाहू लागली. त्यामुळं गावाचं नाव वैतागवाडी बदलून आशाकिरण वाडी ठेवण्यात आलं. 

आदिवासी बांधवांनी कृषी क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून खडकाळ जमिनीवर आंब्याची लागवड केली होती. त्यांची पाहणी करून आदिवासींशी संवाद साधला होता. आज त्या गावावर शोककळा परसरलीय. गावचे लोक आज ही त्या आठवणी जागवताना दिसतायत. 

पाहा व्हिडिओ -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.