नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेने ६० हजार शेतकऱ्यांचे खाते गोठवली आहेत. या प्रकरणी जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत आज शेतकरी आणि संचालक यांच्या जोरदार बाचाबाची झाली आहे.
बॅंकखाती लवकरात लवकर मोकळी करण्याची करा अन्याथा दोन दिवसात निर्णय झाला नाही तर बँकेला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही शेतक-यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांची गोठवलेली खाती लवकरात लवकर मोकळी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. भांडवल पर्याप्तता नऊ टक्क्यांच्या खाली घसरल्याचे कारण देत शेतकऱ्यांची बँक खातीच कर्जाशी लीन करून घेतल्याने खाते गोठवल्यात जमा आहेत.
मात्र या महिन्यात शेतकऱ्यांना पिककर्ज गरजेचं असतं, म्हणून या काळात शेतकऱ्यांची खाती गोठवली असतील तर ही गंभीर बाब होवू शकते.