नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयात सतत होणाऱ्या चोऱ्या संगणकीकरणांच्या मुळावर उठल्या आहेत. सीसीटीव्ही तसचं विशेष सुरक्षारक्षक तैनात असताना महत्वाचे दस्तेईवज असलेले संगणक गायब होत असल्याने संशायाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत सघ्या चोरांची लक्ष्य बनली आहे. गेल्या चार वर्षात तब्बल सहा वेळेला या कार्यालयात वेगवेगळ्या विभागांत चोरी झालीय. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या योजनांची कागदपत्रं, मतदार याद्या आणि संगणक असं चोरीला गेलंय.
मंगळवारी रात्री पुन्हा एकदा चोरट्यांनी पुरवठा विभागातील मुख्य कार्यालयातून शिधा पुरवणा-या माहितीवरच डल्ला मारलाय.
चोरी होऊ नये याची जबाबदारी पार्किंग ठेकेदार, सुरक्षा रक्षकासह सात जणांवर टाकण्यात आली होती..पण काहीही फायदा झाला नाही. दोन जणांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आलीय.
विशेष म्हणेज चोर इतके सराईत आहेत की पोलिसांना अजून एकाही चोरीचा उलगडा झालेला नाही. आता जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या या प्रशासनाने स्वतंत्र पोलीस चौकी मागत आपली सुरक्षा बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.