'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो

मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. 

Updated: Feb 3, 2016, 03:55 PM IST
'नासा'ने अंतराळातून टिपले मुंबईच्या धुराचे फोटो title=

मुंबई : २७, २८ आणि २९ जानेवारीला मुंबईत सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं. पहिल्यांदा धुकं वाटणारं हे मात्र प्रत्यक्षात धुरकं होतं. मुंबईच्या ईशान्येला असणाऱ्या देवनार डंम्पिंग ग्राऊंडला आग लागली होती त्याचा हा धूर सर्वत्र पसरला होता. 

देवनार आणि चेंबूर परिसरात या आगीच्या धुराचा सर्वात जास्त त्रास झाला. येथील अनेक शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. अजूनही ही आग पूर्णपणे विझलेली नाही. पण, या आगीचा धूर मुंबई शहरातही पसरला होता. 

आता अमेरिकी अंतराळ संस्था 'नासा'ने या आगीचे अंतराळातून टिपलेले काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. हे फोटो पाहिल्यावर आगीच्या आणि धुराच्या या भयंकर रुपाची कल्पना येते. त्यातलेच काही फोटो 'झी २४ तास'च्या प्रेक्षकांसाठी.